लढाई भारतमातेच्या वीर सुपुत्रांची, घामाचा पैसा परत मिळवण्याची
ही व्यथा आहे भारतीय सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या शोषणाची. शत्रूविरुद्ध आपल्या प्राणांचीही तमा न बाळगणाऱ्या सैनिकांना घराचं आमिष दाखवून लुबाडणाऱ्या आपल्याच देशातल्या निर्लज्ज बिल्डर शंकर नांगरेची आणि ही कथा आहे, गेंड्याची कातडी घेऊन आलेल्या बेलापूर पोलिसांचीही. ही कथा आहे कुणी घर देता का घर असं म्हणत फिरणाऱ्या लाचार भारतीयांची, तुमची आमची सर्वांची
![]() |
| शंकर नांगरे, श्री साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्स |
रायगड जिल्ह्यातल्या मुक्काम पोस्ट चिपळे, न्यू पनवेल इथे साई अंबर रेसिडेन्सीच्या योजनेत घर देण्याची आशा लावून शंकर नांगरे नावाच्या एका लुंग्यासुंग्या बिल्डरनं २०११ सालापासून अनेकांना अक्षरश: नागवलं. DHFL अर्थात Dewan Housing Finance Corp. Ltd सारख्या प्रसिद्ध कंपनीने या प्रकल्पाची श्री साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचे सह-भागीदार म्हणून जाहिरात केली. DHFLच्या कार्यालयात या प्रोजेक्टचे धनादेश सुरवातीच्या काळात स्वीकारले जात होते. DHFLनं गृहकर्ज देण्याचंही मान्य केलं होतं. DHFL सारखा मोठा ब्रँड, परवडणारी किंमत म्हणून मुंबईच्या पलीकडे, पार पनवेल शहराच्याही बाहेर असले तरी हक्काचे घर मिळेल अशी आशा लोकांना वाटली. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलात काम केलेल्या अनेक जवानांनी आपल्याला हक्काचं घर मिळतेय या विश्वासाने शंकर नांगरे या लफंग्याच्या श्री साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्स या फारसे परिचित नसणाऱ्या विकासकाकडे आपली आयुष्यभराची पुंजी जमा केली.
२०% रक्कम Earnest Money म्हणून जमा करा, बाकीचे पैसे करारनामा केल्यावर द्या, DHFL कर्ज पुरवठा करेलच, दोन वर्षात घराचा ताबा देतो अशी जाहिरात शंकर नांगरेने केली. त्यावर विसंबून कुणी दोन लाख, तर कुणी दहा लाख रुपये अशी रक्कम शेकडो लोकांनी चेकद्वारे विकासकाकडे जमा केली. ही एकत्रित रक्कम पाच कोटी रुपयांच्या वर असेल असा अंदाज आहे. बांधकामाला सुरुवातही झाली नाही आणि कुणाशी लेखी करारनामाही झाला नाही. पण सगळे नियम धाब्यावर बसवत, ज्या प्रकल्पाला कसलीही मंजुरी नाही त्या प्रकल्पातल्या घरांचे Provisional Allotment Letters त्याने आमच्यापैकी सगळ्यांना धडाधड देऊन टाकले.
![]() |
| फोटो: gomolo dot co dot in वेबसाइटवरून साभार |
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा सोहळा करण्याचा तमाशाही शंकर नांगरेनं केला. कुणाला किती पैसे वाटले, कुणास ठाऊक? पण प्रकल्पानुसार गृहबांधणीची प्रगती मात्र शून्य. सतत काहीना काही करणे देत त्याने लोकांना झुलवत ठेवलं. या काळात नवे बकरे शोधून यांच्याकडून booking amount उकळण्याचा गोरखधंदा त्याने सुरूच ठेवला.
![]() |
| घोटाळेबाज बिल्डर शंकर नांगरेला कार्यालयात घेराव |
गेल्या सहा वर्षात घर बांधणीला सुरुवातच न झाल्यानं अखेर तगादा लावून लोकांनी आपले कष्टार्जित पैसे परत मागितले. आमचे हक्काचे, स्वतःचे पैसे परत करा अशी मागणी घेऊन नांगरेच्या ऑफिसात आलेल्या माजी सैनिकांशी बोलताना कमरेचं रिव्हॉल्वर टेबलावर काढून ठेवून चर्चा करण्याची या शंकर नांगरेची भाडखाऊ स्टाईल! असल्या फिल्मी आयडिया देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांसमोर उपयोगी पडत नाहीत हा भाग वेगळा.
सहा वर्ष बिनव्याजी पैसे वापरून नुकसान भरपाई, व्याज देणं तर दूर राहिलं पण मूळ booking amount परत करतोय तेच मुळी तुमच्यावर उपकार करतोय असा आव आणत या चोराने लोकांना ICICI बँकेचे चेक दिले पण यच्चयावत सगळेच्या सगळे चेक बाउन्स झाले. एकही चेक क्लिअर होणं शक्यच नव्हतं कारण या लफंग्यांच्या खात्यात फुटकी कवडीही नाही. एखादा माणूस खात्यामध्ये शून्य रुपयांचा बॅलन्स असतांना लोकांना लाखो रुपयांचे चेक वाटतोय, ते ओळीनं बाउन्स होताहेत पण चेकबुक सुविधेसह श्री साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचं खातं क्रमांक ०८७३०५०००८७४ सुरूच ठेवण्याचा ICICI बँकेच्या सेक्टर ११ मधल्या बेलापूर शाखेचा उफराटा कारभारही खरंतर स्वतंत्र चौकशीचा विषय आहे.
![]() |
| पोलिसांकडून मात्र अद्याप काहीच सहकार्य नाही |
बेलापूर पोलिसांना वारंवार निवेदनं आणि पुराव्यांसह सविस्तर माहिती देऊनही त्यांच्याकडून अद्याप कारवाई शून्य! आम्ही अधिक चौकशी करतोय आणि मग गुन्हा दाखल करायचा का, कोणत्या कलमांखाली दाखल करायचा ते ठरवू, पोलिसांच्या वकिलांचा सल्ला मागावलाय असं साचेबद्ध उत्तर नवी मुंबई पोलीस गेले अनेक महिने देत आहेत. शंकर नांगरेचा पद्धतशीर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा ढळढळीत समोर दिसत असतांना पोलिसांची चालढकल का होते त्याची कारणं कुणीही सांगू शकेलच. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असणाऱ्या देवेन्द्र फडणवीस यांनीच काही लक्ष घातलं तर आम्हा माजी सैनिकांना आणि मध्यमवर्गीय नागरिकांना न्याय मिळू शकेल अशी अंधुक आशा आहे. शंकर नांगरे परदेशात पळून जाण्यापुर्वी त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला गजाआड करावं आणि आमची रक्कम आम्हाला व्याजासह परत मिळावी एवढी अपेक्षा आजी - माजी सैनिक या नात्याने आम्ही भारत देशात ठेवू शकतो काय?
शंकर नांगरेला अद्दल घडवण्याचा आणि आमचा सर्व कायदेशीर पातळ्यांवर आमचा लढा तीव्र करायचं आम्ही ठरवलंय. तुम्हीपण या लढ्यात सहभागी व्हा ही नम्र विनंती आहे. प्रसार माध्यम, पत्रकार, वकील, सामाजिक संस्था यांची मदत, सल्ला आम्हाला हवाय. शत्रू राष्ट्रातल्या अतिरेक्यांशी आम्ही लढाई सुरु ठेवूच पण देशाला अंतर्गत पोखरणाऱ्या शंकर नांगरेंसारख्या सापाला आधी ठेचूया.
legalsaiamber@gmail.com या मेलवर आम्हाला संपर्क साधा ही विनंती.
शंकर नांगरेच्या भूलथापांना आम्ही बळी पडलो, पुरेशी शहानिशा केली नाही त्यामुळे आमची आयुष्यभराची, एकत्रितपणे कोट्यवधी रुपयांची कमाई त्याच्याकडे अडकून पडली. आता निवृत्ती जवळ आल्यावर आम्हाला भाड्याच्या घरांत आणि काहींना तर झोपडपट्टीत राहावं लागतंय अशी वेळ दुर्देवाने आमच्यावर आलीय. मात्र तुमच्या नातेवाईक, मित्रांनी किंवा अजून कुणीही पनवेल, नवी मुंबईतल्या शंकर नांगरे, श्री साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्स किंवा नव्याने बदललेलं नाव - साईभूमी डेव्हलपर्स या चोरांकडे आपले कष्टार्जित पैसे देण्याची चूक करू नये म्हणून हा ब्लॉग तुमच्या फेसबुक पेजवर नक्की शेअर करा ही विनंती.
जयहिंद




Comments
Post a Comment